23 व 24 ऑगस्ट लोणी येथे रंगणार मैदानी स्पर्धेचा थरार
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे दि.16 व 17 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय मैदानी (ॲथलेटीक्स) स्पर्धा पावसामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125 व्या जयंती निमित्त ही स्पर्धा प्रवरा स्पोर्टस अकॅडमी आणि अ. नगर जिल्हा ॲमेचर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 व 24 ऑगस्ट रोजी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोणी येथे होणार आहे.
14, 16, 18, 20 व 23 वर्षा आतील मुले व मुलींच्या मैदानी स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्याचे आवाहन छत्रपती पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर व सचिव दिनेश भालेराव यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या विविध गटातील प्रथम दोन क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्हा संघात निवड होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत निवड झालेले खेळाडू आहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी स्पर्धा ठिकाणी ऑफलाईन नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपल्या सोबत मूळ जन्म दाखला व आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे असोसिएशनच्या वतीने म्हंटले आहे. ही स्पर्धा ज्यांचे आधार कार्ड अहिल्यानगर जिल्ह्याचे असेल अशा स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे, डॉ. राम पवार, डॉ. उत्तम अनाप, रमेश दळे, रमेश वाघमारे, प्राचार्य संदीप हारदे, राहुल काळे व सर्व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9226238536, श्रीरामसेतू आवारी 9322015046, जगन गवांदे 9881328186 व रावसाहेब मोरकर 9657565456 यांना संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.