नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील चंद्रभागा सुदाम भिवसने यांचे बुधवारी (दि. 15 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त मजदूर होत्या.
धार्मिक, कष्टाळू व मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुना, नातू, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे. येळपणे येथील माध्यमिक शिक्षक भिवसने यांच्या त्या आई, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने यांच्या आजी होत्या. त्यांच्यावर पिंपळगाव पिसा हंगा नदी तिरी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.