• Sat. Mar 21st, 2026

निरोगी आरोग्याची ‘गुढी’ उभारून हरदिन मॉर्निंग ग्रुपचा 26 वा स्थापना दिवस साजरा

ByMirror

Mar 21, 2026

वृक्षारोपण, स्वच्छता अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


26 वर्षांपासून सुरू असलेली आरोग्य व सामाजिक चळवळ प्रेरणादायी -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ सातत्याने राबवणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुवारी (दि. 19 मार्च) 26 वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या योग भवनात ‘निरोगी आरोग्याची गुढी’ उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर महिलांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. उद्यानातील भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले. यावेळी धम्ममित्र संजय भिंगारदिवे व दीपक अमृत यांनी त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध वंदना सादर केली. कार्यक्रमानंतर सर्व सदस्यांनी एकत्रितपणे उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.


या उपक्रमात नागरिकांना मिठाई वाटप करून मराठी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रांजली सपकाळ, उषाताई ठोकळ, सुरेखा आमले, मायाताई गोरखा, सरिता शिंदे, आरती बोराडे, भारती कटारिया, संगीता सपकाळ, ज्योती भिंगारदिवे, धनश्री बच्छावत, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, रमेश वराडे, दिलीप ठोकळ, अशोक लोंढे, संजय भिंगारदिवे, अशोक पराते, योग शिक्षक प्रकाश देवळालीकर, दीपक धाडगे, सुंदर पाटील, संजय ढोणे, गोकुळ धाडगे, रतन मेहेत्रे, दीपक घोडके, सुधीर कपाले, अविनाश जाधव, अभिजीत सपकाळ, सीए रवींद्र कटारिया, सीए श्रेयांश कटारिया, सीए अभिषेक बिहाणी, पार्श बच्छावत, ईवान सपकाळ, ॲड. रोहित भंडारी, ॲड. उध्दव चिमटे, इंजि. अनिल सोळसे, सुभाष पेंढुरकर, सरदारसिंग परदेशी, संकेत शिंदे, अनिल हळगावकर, जयराम मेहतानी, मुन्ना वाघस्कर, निजाम पठाण, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, दीपक अमृत, विशाल भामरे, विनोद खोत, जालिंदर आळकुटे, नवनाथ वेताळ, अनंत सदलापूर, योगेश हळगावकर, दशरथ मुंडे, तुषार घाडगे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, प्रज्योतसिंग सागू, कुमार धतुरे, शिवकुमार पांचारिया, विकास निमसे, अजय खंडागळे, गोकुळ भांगे, सौरव भारस्कर आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सांगितले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील 26 वर्षांपासून योग, प्राणायाम यांसारख्या उपक्रमांद्वारे आरोग्य चळवळ राबवली जात आहे. यासोबतच वृक्षारोपण व संवर्धनातून पर्यावरणाचे जतन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून गरजू घटकांना मदत, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येकाने निरोगी आयुष्यासाठी व्यायाम आणि शारीरिक-मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. हरदिन ग्रुपची 26 वर्षांची सातत्यपूर्ण चळवळ समाजासाठी प्रेरणादायी असून, आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले योग भवन भविष्यात आरोग्य चळवळीचे केंद्र बनेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
सीए रवींद्र कटारिया यांनी हरदिनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ग्रुपचे सदस्य सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे ऋण फेडत आहेत. दुष्काळी परिस्थितीतही सदस्यांनी वर्गणी करून उद्यानातील झाडे जपली, ही त्यांची निस्वार्थ वृत्ती अधोरेखित करणारी बाब असल्याचे सांगितले.


सचिन चोपडा यांनीही मागील पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत, विविध सण-उत्सव सामाजिक उपक्रमातून साजरे केले जात असल्याने हा ग्रुप सर्वांसाठी एक कुटुंब बनल्याचे सांगितले. ह.भ.प. गोकुळ महाराज धाडगे यांनी हरदिनच्या कार्यातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे नमूद केले. आभार सर्वेश सपकाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *