शिरुर कासारला बुध्द रुप दान
खासदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून केले उपक्रमाचे कौतुक
नगर (प्रतिनिधी)- शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने बुद्ध विहार तेथे बुध्द रुप! हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, याअंतर्गत भव्य बुध्द मुर्ती समाजबांधवांना बुद्ध विहारासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु असून, शिरुर कासार (ता. आष्टी, जि. बीड) येथे भव्य बुध्द रुप दान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडलेल्या या सोहळ्याला खासदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या माध्यमातून सुरु असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. खासदार लंके म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून धार्मिकतेला सामाजिक चळवळीची जोड देवून कार्य सुरु आहे. संजय कांबळे हे चळवळी मधील कार्यकर्ते असून, धम्माचा प्रचार-प्रसार करुन समाजाला जोडण्याचे काम करत आहे. गोर-गरीब व अनाथांचे लग्न लावून देण्यासह धार्मिकतेने युवक-युवतींना दिशा देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यातून सर्व समाजाला भगवान गौतम बुध्दांचे विचार समजणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
भंन्ते धम्मपाल व भंन्ते नागसेन यांनी बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी संजय कांबळे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, डॉ. वानखडे, डॉ. विश्वास गायकवाड, प्रा. रमेश पगारे, ग्रामपंचायत सदस्स सुनिल जाधव, शेखर पंचमुख, शिवाजी भोसले, अशोक बागुल, आण्णा गायकवाड, संगीता घोडके, अनिता पंडित, कुसुम भिगारदिवे, लता भिंगारदिवे, मायाताई जाधव, सरिता गांगुर्डे, अविनाश भोसले, युवराज सोनवणे, विजय कांबळे, सुरेश पानपाटिल, बाळासाहेब बनकर, प्रमोद शिंदे, संतोष गायकवाड, शाम वाघचौरे, संदिप वाघमारे, भरत शिरसाठ, बाळू गायकवाड, सुभाष कांबळे, नितिन साळवे, विजय साळवे, संतोष कांबळे, मिलिंद आंग्रे, सिध्दांत कांबळे, विष्णू ठोंबे, सुरेश भिंगारदिवे, जिवा कांबळे, अनिकेत भिंगारदिवे, प्रकाश कांबळे, धोडिंबा राक्षे, राम गायकवाड, शांताराम बनसोडे, प्रशांत शिंदे, भिमराज शिंदे, शिवचरण लाल, शरद बनसडे आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संजय कांबळे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असलेले बुद्ध विहार सक्षम करुन समाज जोडण्याचे काम थागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाने हाती घेतले आहे. प्रत्येक बुद्ध विहारात चांगल्या पध्दतीने भव्य असे बुध्द रुप असणे आवश्यक आहे. अनेक बुद्ध विहारात बुध्द रुप नसल्याने ते उपलब्ध करुन देण्याचे कार्य सुरु आहे. फक्त मुर्ती नव्हे तर बुध्दांचे विचार देखील देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे. धम्माच्या जागृतीचे बीज रोवण्याचा प्रयत्न आहे. तथागत बुद्धिस्ट सोसायटी ही संस्था बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बुद्ध विहार तेथे बुध्द रुप हा उपक्रम फक्त धार्मिकतेपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक ऐक्य, ज्ञानप्रसार आणि प्रेरणादायी विचारांच्या प्रसाराचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. अशा कार्यक्रमांद्वारे समाजजागृती व बौद्ध विचारांची रुजवणूक ही काळाची गरज असल्याची भावना भंन्ते धम्मपाल व भंन्ते नागसेन यांनी व्यक्त केली.