• Tue. Nov 4th, 2025

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शहर अध्यक्षपदी ब्रिजेश ताठे

ByMirror

Aug 13, 2025

तर शहर कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक चिपाडे यांची नियुक्ती

नगर (प्रतिनिधी)- शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शहर अध्यक्षपदी ब्रिजेश ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ व कार्याध्यक्ष मा.खा. समीर भुजबळ यांनी अहिल्यानगर महानगर अध्यक्षपदी ताठे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. तर शहर कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक चिपाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


ब्रिजेश ताठे व अभिषेक चिपाडे सामाजिक चळवळीत सक्रीय असून, महात्मा फुले समता परिषदेशी जोडले गेलेले आहे. समाजाचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समता परिषदेवर पदाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी संधी देण्यात आली आहे.


ना. छगनराव भुजबळ व मा.खा.समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, रवी सोनवणे व प्रदेश प्रवक्ते डॉ. नागेश गवळी यांनी जो विश्‍वास दाखवला आहे, तो मी माझ्या कामातून सार्थ करून दाखवेल.

सर्व ओबीसी बहुजन समाजाला सोबत घेऊन शहरात काम करणार आहे. लवकरच शहराची प्रभाग निहाय बैठक घेऊन कार्यकारणी व शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार तळागाळात रुजविण्यासाठी व ओबीसी बहुजन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समता परिषद कटिबद्ध राहणार असल्याचे ताठे यांनी सांगितले. अभिषेक चिपाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये व समता परिषदेच्या ध्येय-धोरणानूसार शहरात कार्य करुन युवकांचे संघटन करण्याचा निर्धार व्यक्त केला.


या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग, आमदार संग्राम जगताप, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, अनिल निकम, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, माजी महापौर भगवान फुलसौदर, माजी नगराध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी सभापती किशोरजी डागवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, उद्योजक संजय गारुडकर, विलासराव ताठे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, दत्ता जाधव, धनंजय जाधव, रवींद्र बारस्कर, बाळासाहेब भुजबळ, डॉ. रणजीत सत्रे, अर्जुनराव बोरुडे, योगेश ठुबे, महेश कराळे, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर, अमोल बोरुडे, भरत गारुडकर, विशाल वालकर, किशोर जेजुरकर, बाळासाहेब मेहेत्रे, प्रसाद भडके, बाबासाहेब दळवी, प्रसाद शिंदे आदींसह त्रिशूल मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *