• Wed. Jul 2nd, 2025

महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात भाजपची यंत्रणा सरसावली

ByMirror

Nov 11, 2024

घरोघरी भेटीगाठी घेऊन जनतेला कल्याणकारी कामांची करुन दिली आठवण

महायुतीचा उमेदवार निवडून आल्यस विकासाची घौडदौड अखंडपणे सुरु राहणार -ॲड. अभय आगरकर

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. 8 मधील शिवाजीनगर, कल्याण रोड परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली. मतदारांच्या गाठी-भेटी घेऊन महायुती सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची आठवण करुन देत मतदानासाठी आवाहन करण्यात आले.


प्रचार रॅलीत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, ज्येष्ठ भाजप नेते सुनील रामदासी, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथ्था, महेश नामदे, पंडित वाघमारे, सौ. सविता कोटा, संतोष गांधी, ॲड. विवेक नाईक, अमोल निस्ताने, सुरेश लालबागे, महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे, प्रदेश सचिव सुरेखा विद्ये, संध्या पावसे, श्‍वेता पंधाडे, सुजाता पुजारी, मीराबाई सरोदे, जयश्री क्यातम, सुनीता न्यालपेल्ली, शुभांगी सैबेवार, सारिका इथापे, रविंद्र बाकलीवाल, धिरज पोखरणा, सचिन कुसाळकर, मुकुल गंधे, लक्ष्मीकांत तिवारी, रेणुका करंदीकर, अजिंक्य गुरावे, राज शेलार, कुंडलिक गदादे, सुनिल तावरे, ॲड. राहुल रासकर, संतोष शिरसाठ, दत्ता गाडळकर, दामोदर बठेजा, राहुल जामगावकर, सुनील सकट, चेतन जग्गी, भुमय्या कोटा, अक्षय ढवळे, जयश्री क्यातम आदी सहभागी झाले होते.
ॲड. अभय आगरकर म्हणाले की, शहरात महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपने स्वतंत्र यंत्रणा उभी करुन जनतेशी संवाद साधला जात आहे. भाजपचा जनसंपर्क महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शहराच्या विकास कामासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. महायुतीचा उमेदवार निवडून आल्यस विकासाची घौडदौड अखंडपणे सुरु राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


सविता कोटा म्हणाल्या की, लाडक्या बहिणी निश्‍चितच महायुतीचे उमेदवार असलेल्या लाडक्या भावाला विजयी करणार आहे. महिलांना संरक्षण व सन्मान मिळवून देण्याचे काम महायुती सरकारने केले. त्याची परतफेड जनता मतांच्या रुपाने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दत्ता गाडळकर म्हणाले की, सर्व वर्गातून महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, कामगार वर्गाचे प्रश्‍न सोडवून त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम महायुती सरकारने केले. शहराचा विकास साधण्यासाठी सत्ता असल्याने मोठा निधी मिळवता आला. अडीच वर्षात महायुती सरकारने राज्यात कल्याणकारी योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *