• Wed. Jul 2nd, 2025

शहरात भाजपच्या हर घर सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

ByMirror

Jan 11, 2025

विविध दुकानदार, व्यावसायिक, टपरीचालक, रिक्षा चालकांनी केली ऑनलाईन सदस्य नोंदणी

संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील -अभय आगरकर

नगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे. घरोघरी, महाविद्यालय व विविध संस्थेत जाऊन सभासद नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक नागरिकांना देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे सदस्य बनवून घेतले जात असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले.
शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील रेल्वे स्टेशन परिसरात हर घर सदस्य नोंदणी अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी आगरकर बोलत होते. याप्रसंगी माजी उपमहापौर गीतांजलीताई काळे, शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड, सुरेश लालबागे, पुंडलिकराव गदादे, पंडित खुडे, ताराचंद भनगे, सागर गांधी, भगवान कुडधने, रोहन गोंटे, सिद्धू झावरे, शंतनू गाडळकर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दत्ता गाडळकर म्हणाले की, हर घर सदस्य नोंदणीला नागरिकांमधून स्वयंफुर्तीने प्रतिसाद मिळत आहे. नागरिक भाजपचे सदस्य होण्यासाठी स्वतःहून इच्छा व्यक्त करत आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक भाजपचे सदस्य होण्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


विशाल खैरे म्हणाले की, कल्याणकारी राज्यामुळे भाजपकडे सर्वसामान्य जनता आकर्षित होत आहे. भाजपने आपल्या सत्तेत सर्वसामान्य नागरिकांना आधार दिला. तर लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. यासाठी नागरिकांमधून सदस्य होण्यासाठी मागणी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रेल्वे स्टेशन भागातील विविध दुकानदार, टपरीचालक, रिक्षा चालक, व्यावसायिक व घरोघरी जावून नागरिकांची ऑनलाईन पध्दतीने सभासद नोंदणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या पुढाकाराने ही मोहिम राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *