जनतेच्या विकासकामांतून उतराई करणार” – सुनिताताई खेतमाळीस
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने शहरात श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व सन्मान सोहळा माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास भाजप व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, विविध समाजांचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते एम. डी. शिंदे, माळी समाजाचे नेते नगरसेवक शहाजी बापू खेतमाळीस, बाजार समितीचे संचालक काका नवले, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब उपाध्यक्ष गणेश बनकर, यश पानमळकर, ॲड. महेश शिंदे विनायक नेवसे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस म्हणाल्या की, “श्रीगोंदा शहरातील जनतेने माझ्यावर आणि आमच्या सर्व नगरसेवकांवर जो विश्वास टाकला आहे, त्याची उतराई विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा माझा संकल्प आहे. हा विजय एखाद्या नसून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने व पारदर्शक काम केले जाईल.”
त्या पुढे म्हणाल्या, “शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठी योजना, तसेच दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ श्रीगोंदा शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी नगरपरिषद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर म्हणाले की, “सुनिताताई खेतमाळीस या एक अभ्यासू, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देतील. ओबीसी समाजासह सर्व घटकांना न्याय देणारे निर्णय त्यांच्या नेतृत्वात घेतले जातील यावेळी उपस्थितांनी नगराध्यक्षा खेतमाळीस व नवनिर्वाचित शुभेच्छा दिल्या. आभार नगरसेवक शहाजी बापू खेतमाळीस यांनी मानले.
