सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु -रघुनाथ आंबेडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या नगर जिल्हा सल्लागार प्रमुखपदी ॲड. दिपक बोरुडे व जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब डोळस यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशान्वये प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
नवनिर्वाचित पदाधिकारी ॲड. बोरुडे व डोळस यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला ॲड. बोरुडे पिंपरी जलसेन (ता. पारनेर) व बाबासाहेब डोळस (ता. नगर) येथील असून, त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून संधी दिली जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे व भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी संघटनेचा लढा असल्याचे सांगून, त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेवून भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या विविध पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे व भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेसाठी संघटना कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडीचे स्वागत करुन राज्य मुख्य सलागार ॲड. अरविंद अंबेटकर, राज्य उपाध्यक्ष अनिल ठोंबरे, अहमद मुंडे, बाबासाहेब कांबळे, राज्य सरचिटणीस अंबादास शिंदे, राज्य कार्याध्यक्ष अमोल सोळंकी, मुख्य संपर्क प्रमुख प्रकाश घोळवे, राज्य संपर्क प्रमुख संतोष कांबळे, मुख्य कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्य संघटक प्रकाश खैरमोडे, राज्य युवाध्यक्ष भाऊसाहेब घोडके, कार्याध्यक्ष पै.अमोल सोळंके, राज्य महिलाध्यक्षा ॲड. शोभाताई बुध्दीवंत-सातपुते, मराठवाडा अध्यक्षा रुक्मीणीताई गिरी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मनिषा गुरव, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल बोरगे, जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास साळवे, उमेश गायकवाड आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
