खेळाडूंनी दाखवले वेग आणि कौशल्याचे कसब
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन संलग्न ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली. अकॅडमीच्या मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवला. वेग आणि कौशल्याचे कसब खेळाडूंनी दाखवली. वाऱ्याच्या गतीने धावणाऱ्या खेळाडूंनी रोमांचक पध्दतीने खेळाचे प्रदर्शन केले.
रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे संचालक बाळासाहेब खोमणे, प्रणिता मेंडसूरे, महेश झोडगे, आसिफ शेख, प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, जयेश आनंदकर, अमर लोंढे, संजू वाखरे आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजक शुभम कर्पे व प्रमोद डोंगरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन स्पर्धेची माहिती दिली. बाळासाहेब खोमणे यांनी जीवनात प्रत्येक स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी खेळाडूंनी ठेवावी. खेळाडूवृत्तीने जीवनाचा खरा आनंद लुटता येत असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा 5, 9, 11 व 14 वर्षा आतील व 14 वर्षा वरील खेळाडूंसाठी बिगनर, क्वाड्स, व्यावसायिक इनलाइन व फॅन्सी इनलाइन या प्रकारात पार पडली. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पदके उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. तर सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील दिनशेपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.