• Tue. Jul 1st, 2025

कामगार दिनानिमित्त भिंगारला उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान

ByMirror

May 1, 2025

हरदिनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नातवाच्या नावाने एक झाड या उपक्रमास प्रारंभ

उद्यान विभागातील कामगारांचा पर्यावरण संवर्धनासाठी हातभार -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- कामगार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुवारी (दि.1 मे) भिंगार कॅन्टोन्मेंट मधील उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान करण्यात आला. भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये झालेल्या कामगार दिनाच्या कार्यक्रमात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होत असताना ग्रुपच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नातवाच्या नावाने एक झाड या उपक्रमाचे प्रारंभ देखील करण्यात आले. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रारंभी भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास अभिवादन करुन विकास भिंगारदिवे बुद्ध वंदना केली. ईवान सपकाळ व नंदलाल परदेशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वर्षभर उद्यानातील झाडांची काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणारे कॅन्टोन्मेंट उद्यान विभागातील दिपकराव अमृत, विशाल भामरे, दीपक गायकवाड, राहुल भिंगारदिवे यांचा सत्कार सोहळा पार पडला.


या कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिनशेठ चोपडा, रमेश वराडे, रतनशेठ मेहेत्रे, जहीर सय्यद, अशोकराव लोंढे, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, कांताताई झंवर, संगीता सपकाळ, सविताताई परदेशी, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, सुनिता चव्हाण, कांताबाई स्वामी, लताबाई सपकाळ, दिलीपराव ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, दीपकराव धाडगे, विकास भिंगारदिवे, सुधीरशेठ कपाळे, विलास आहेर, दिलीपशेठ गुगळे, अशोकराव पराते, दीपकराव घोडके, कुमार धतुरे, प्रशांत भिंगारदिवे, अनंत सदलापूर, चुनीलाल झंवर, सरदारसिंग परदेशी, सुभाष पेंढुरकर, शेषराव पालवे, अनिलराव सोळसे, अविनाश जाधव, योगेश चौधरी, अविनाश पोतदार, अनिल हळगावकर, रामनाथ गर्जे, राजू कांबळे, रमेश कोठारी, सूर्यकांत कटोरे, नामदेवराव जावळे, सुहास देवराईकर, विकास निमसे, सिताराम परदेशी, विनय महाजन, बाळासाहेब झिंजे, महेश सरोदे, देविदास गंडाळ, प्रकाश गांधी, प्रवीण परदेशी, दशरथराव मुंडे, सागर काबरा, संदीप शिंगवी आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, कॅन्टोन्मेंट उद्यान विभागातील कामगार पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत आहे. हरदिन ग्रुपच्या सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरण चळवळ पुढे घेऊन जाण्याचे कार्य हे कामगार वर्ग करत आहे. वर्षभर उत्तमपणे कार्य करणाऱ्या कामगारांचा सन्मान होणे आवश्‍यक असून, या दृष्टीकोनाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


नंदलाल परदेशी यांनी कामगार वर्ग समाजातील वैभव निर्माण करण्याचे व टिकविण्याचे काम करतात. विकासात कामगार वर्गाचा सर्वात मोठा वाटा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभर उद्यानातील झाडांचे पालनपोषण करणाऱ्या कामगारांचा झालेला सन्मान अभिनंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना उद्यानातील कामगार वर्गाने हरदिनच्या माध्यमातून दरवर्षी कामगार दिनी होत असलेला सन्मान आणखी चांगले काम करण्यास प्रेरणा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *