• Sat. Sep 20th, 2025

एकता दौडमध्ये धावले भिंगारकर

ByMirror

Oct 31, 2023

हरदिन मॉर्निंग ग्रुपने दिला निरोगी आरोग्यासह पर्यावरण सवर्धनाचा व मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश

राष्ट्रीय एकात्मतेची व कर्तव्य पार पाडण्याची घेतली शपथ

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या वतीने भारताचे लोहपुरुष तथा माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन एकता दौडचा प्रारंभ करण्यात आला. या दौडमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तर भगवान गौतम बुध्द जॉगींग पार्क ते छावणी कार्यालय पर्यंत एकता दौड राबवून निरोगी आरोग्य, मुलगी वाचवा… मुलगी शिकवा, झाडे लावा… झाडे जगवा, पर्यावरण वाचवाचा संदेश देण्यात आला.


मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) सकाळी 7:30 वाजता हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी भगवान गौतम बुध्द जॉगींग पार्क येथून एकता दौडला प्रारंभ केले. ग्रुपच्या सदस्यांनी हातात घेतलेल्या विविध सामाजिक संदेश फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर छावणी कार्यालय येथे या एकता दौडचा समारोप करुन छावणी परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या एकता दौडमध्ये सर्व सदस्य सहभागी झाले होते.


प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. ब्रिगेडियर रसोल डिसूजा व छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी व नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि नागरी कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, उद्योजक लॉरेन स्वामी, कॅन्टोन्मेंटचे सदस्य वसंत राठोड, श्‍यामराव वाघस्कर, रनर योगेश खरपुडे, कार्यालयीन अधीक्षक पारनाईक मॅडम, स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, सुनील शिंदे, मुख्याध्यापक संजय शिंदे, राजेंद्र भोसले, अरविंद कुडिया, रमेश वराडे, किशोर बोरा, मेजर दिलीप ठोकळ, सुरेश खामकर आदी उपस्थित होते.


ब्रिगेडियर रसोल डिसूजा यांनी पर्यावरणाच्या रक्षणासह निरोगी आरोग्य जगण्याचा संदेश दिला. संजय सपकाळ यांनी पर्यावरण संवर्धन व निरोगी आरोग्याची चळवळ चालविताना हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते. समाजातील गंभीर प्रश्‍नावर लक्ष वेधण्यासाठी या दौडच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सकाळी 8 वाजता छावणी कार्यालय येथून एकता दौडला प्रारंभ झाले. दौडमध्ये सहभागी झालेल्यांनी भारत माता की जय…., वंदे मातरमच्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. लाकडी पुलावरून केंद्रीय विद्यालय क्रमांक एक येथे या दौडचा समारोप झाला. या एकता दौडमध्ये चंद्रकला येलुलकर, अपर्णा जगताप, मीनाताई परदेशी, निर्मला टकले, आरती बोराडे, सौ. त्रिमुखे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोतदार, सुभाष पेंढुरकर, अभिजीत सपकाळ, विनोद खोत, संपतराव बेरड, सुहास ढुमणे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, संतोष हजारे, ॲड. उद्धवराव चेमटे, अशोकराव पराते, अशोक लोंढे, नामदेव जावळे, एकनाथ जगताप, सुमेश केदारे, प्रशांत गायकवाड, महेश सरोदे, भिमराव फुंदे, मंगेश मोकळ, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, गणेश भोसले, सूर्यकांत कटोरे, शेषराव पालवे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, शंकरराव पंगुडवाले, विकास निमसे, सोपानराव साळुंके, आनंद सदलापूर, सचिन कचकल, संजय नायडू, अरविंद ब्राह्मणे, छोटू जाधव, महेश गोंडाळ, योगेश चौधरी, रमेश लोंढे, विलास कदम आदींसह हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व भिंगार कॅन्टोन्मेंट विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *