विजयस्तंभ समाज बांधवांच्या ताब्यात येण्यासाठी संघर्षाची हाक
विजयस्तंभ म्हणजे स्वाभिमानाचे प्रतीक -संगिता घोडके
नगर (प्रतिनिधी)- भिमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची आढावा बैठक वाळूंज (ता. नगर) येथे पार पडली. समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरेगाव विजयस्तंभ समाज बांधवांच्या ताब्यात येण्यासाठी सामाजिक आणि न्यायालयीन लढ्याची माहिती देण्यात आली.
वाळुंज येथील बौध्द विहारमध्ये झालेल्या बैठकीचे प्रारंभ त्रिशरण व पंचशील पठणाने करण्यात आले. यावेळी संगीता भिंगारदिवे, शारदाताई बागुल, नगरे काका, गौतम भिंगारदिवे, सुमेधा गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे प्रसारक संतोष गायकवाड, सोनाली उबाळे, लक्ष्मी गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, कविता गायकवाड, सुरेखा गायकवाड, राणी गायकवाड, सविता गायकवाड, रेशमा गायकवाड, श्रद्धा गायकवाड, सुरेखा गायकवाड, लिलाबाई गायकवाड, सखुबाई गायकवाड, सुमनबाई पवार, उर्मिला गायकवाड, अमोल गायकवाड, अविनाश गायकवाड, अंकुश गायकवाड, अमोल गायकवाड, साईनाथ गायकवाड, सनी गायकवाड, सागर पवार, विलास गायकवाड, परमेश्वर गायकवाड, सचिन गायकवाड, बाळासाहेब साळवे, गौरव गायकवाड, मदन पवार आदींसह समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगिता घोडके म्हणाल्या की, विजयस्तंभ म्हणजे स्वाभिमानाचे प्रतीक आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ आपल्या समाजाच्या ताब्यात मिळण्यासाठी भिमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. या संघर्षासाठी समाजबांधवांबरोबरच महिला देखील खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने गाव व तालुका पातळीवर बैठका सुरु असून, या संघर्षाला निश्चितच यश येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच गावातील बौध्द विहार आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाचे त्यांनी कौतुक केले. समता सैनिक दलचे उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आभार मानले.