नगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी सरबत वाटपाचा उपक्रम केला जातो.
प्रारंभी सामुदायिक प्रार्थना करुन सरबत वाटपला प्रारंभ करण्यात आले. यावेळी बी.सी.एफ.आय. संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात भाविकांनी सरबतचा लाभ घेतला.