नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बबनराव सागडे गुरुजी यांचे रविवारी (दि.24 नोव्हेंबर) सकाळी अहिल्यानगर येथे निधन झाले. त्यांचे वय 82 वर्षे होते. शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत अग्रभागी असायचे. अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव व मदत करण्याच्या वृत्तीमुळे ते सर्वांना सुपरिचित होते. गावातील राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमात ते अग्रभागी असायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांचे तसेच भेंडा येथील जिजामाता कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अशोक सागडे यांचे ते वडील होते.