• Sat. Aug 30th, 2025

शहरात एथर रिज्टा टेराकोटा रेडचे अनावरण

ByMirror

Aug 25, 2025

100% सौरऊर्जेवर चालणार एथर शोरूम; पर्यावरणपूरक उपक्रमाकडे महत्त्वाचे पाऊल


पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने हे समाजासाठी वरदान -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- कायनेटिक चौक येथील एथर स्पेस एक्सपीरियन्स सेंटरमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत एथर रिज्टा टेराकोटा रेड आकर्षक व बोल्ड रंगाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर पहिल्या ग्राहकाला या नव्या मॉडलेच्या स्कूटरचे वितरणही करण्यात आले.


या कार्यक्रमाला एथर डीलरशिपचे संचालक गिरधारीलाल नय्यर, रितेश नय्यर, विकी जगताप, ओंकार देशपांडे, शिल्पा नय्यर, लालचंद नय्यर, हरीश नय्यर, हर्ष ओबेरॉय, हितेश ओबेरॉय, हर्षल भंडारी, ओंकार बेंद्रे, भूषण ओस्तवाल, सावन छाब्रा, मोसिन मिर्झा आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, एथर एनर्जीने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आजच्या काळात वाढते इंधन दर, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणातील असमतोल ही गंभीर आव्हाने आहेत. अशा वेळी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक दुचाकी हे समाजासाठी वरदान ठरत आहेत. शोरूमचे संपूर्ण सौरऊर्जेवर रूपांतर हे केवळ व्यावसायिक नव्हे तर सामाजिक जबाबदारीचेही द्योतक आहे. बॅटरी ॲज अ सर्व्हिस सारखी योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एथर एनर्जीने ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांना प्रतिसाद देत ही नवी रंगसंगती बाजारात आणली आहे. वाढते पेट्रोल दर, महागाई आणि प्रदूषण या समस्यांमुळे ग्राहक वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. आकर्षक लूक, उच्च दर्जाचे परफॉर्मन्स आणि फॅमिली-फ्रेंडली वैशिष्ट्ये यामुळे एथरची वाहने ग्राहकांना भुरळ घालत असल्याची माहिती रितेश नय्यर यांनी दिली.


याच पार्श्‍वभूमीवर एथरने ग्राहकांसाठी बॅटरी ॲज अ सर्व्हिस ही नवी सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना बॅटरी खरेदी करण्याची गरज नाही, तर वापरानुसार बॅटरीचे शुल्क द्यावे लागते. ही योजना फक्त 1 रुपये प्रति किमीपासून उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांचा तातडीचा खर्च कमी होईल आणि वाहन खरेदी अधिक परवडणारे ठरेल.


सौरऊर्जेवर चालणार शोरूम
कार्यक्रमादरम्यान एथर स्पेस शोरूमचे 100% सौरऊर्जेवर रूपांतर करण्यात आले. ज्यांच्या घरी सोलर पॅनल्स आहेत त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर वापरणे म्हणजे प्रदूषणावर मात, इंधन व वीज खर्चात बचत आणि स्वच्छ भविष्यासाठीचा महत्त्वाचा बदल आहे. भविष्यातील आव्हान व सामाजिक जबाबदारीने शोरूमला सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *