• Fri. Feb 27th, 2026

नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वारुळे यांचा विविध संस्थांकडून सत्कार

ByMirror

Feb 27, 2026

पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यात सुसंवाद व समन्वय आवश्‍यक -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गणेश वारुळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानिमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


कार्यक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते वारुळे यांना फेटा बांधून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार संजय सावंत उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांनी पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यात सुसंवाद व समन्वय आवश्‍यक असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, गाव व तालुक्याच्या विकासासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस विभागाची जबाबदारी मोठी असून त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्‍यक आहे.


सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनीही आपल्या मनोगतात नागरिकांच्या सहकार्याने पारदर्शक व प्रभावी कामकाज करण्याचा मानस व्यक्त केला. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. अशा परिस्थितीत नागरिकांनीही कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *