• Tue. Jul 22nd, 2025

डोंगरे संस्थेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार

ByMirror

Nov 9, 2023

सानप यांनी नागरिकांमध्ये विश्‍वास व सुरक्षितता निर्माण केली -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह कामगार व महिला वर्गामध्ये विश्‍वास आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सानप यांचा सत्कार केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनची जबाबदारी स्वीकारून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी गुन्हेगारांवर वचक बसविला आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनला देखील त्यांनी उत्कृष्ट कार्य करुन सर्वसामान्यांमध्ये पोलीसांची प्रतिमा उंचावली.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधधंदे चालविणाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुंडगिरी करणारे व रोड रोमीयोंवर प्रतिबंधात्मक कारवाई करून खाकीचा धाक निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे जनसामान्यांमध्ये पोलीस दलाबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली असून, रोड रोमीयो व गुंडांच्या बंदोबस्ताने महिला, कामगार वर्गामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. तर संवेदनशील परिस्थिती हाताळून सण, उत्सावतही शांतता कायम ठेवण्याचे कार्य त्यांनी केले असल्याची भावना पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *