चौधरी यांची उत्कृष्ट कार्यशैली गुन्हेगारीवर वचक निर्माण करणार -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. नुकतेच पोलीस स्टेशनला हजर झालेले चौधरी यांचे स्वागत करुन भालसिंग यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
विजय भालसिंग म्हणाले की, सोनई (ता. नेवासा) येथे कार्यरत असताना माणिक चौधरी यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात धाक निर्माण केला. त्यांनी उत्कृष्ट कार्य करुन नागरिकांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करुन दिले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्य करताना त्यांची उत्कृष्ट कार्यशैली उपयुक्त ठरणार असून, गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.