• Wed. Jun 4th, 2025

अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

ByMirror

Jun 2, 2025

अहिल्यानगर जिल्हा, शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सन्मान

मेतकर यांनी केमिस्ट बांधवांच्या अडीअडचणी सोडवून वेळोवेळी मार्गदर्शन केले -दत्ता गाडळकर

नगर (प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा, शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. मेतकर यांच्या उत्कृष्ट कार्यपध्दतीचे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.


नवीपेठ येथील केमिस्ट भवन येथे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी औषध निरीक्षक जावेद शेख, सौ. गीता मेतकर, कु. साक्षी मेतकर, सोहम मेतकर, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, प्रशांत उबाळे, सचिन शिंदे, भरत सुपेकर, अमित धाडगे, राजेंद्र बलदोटा, मनोज खेडकर, अतुल चांगले, महेश आठरे, अशोक बलदोटा, अनिल गांधी, आशुतोष कुकडे, अवधुत बोरुडे, सुधाकर इंगळे, सचिन ढगे, सागर फुलसौंदर, नितीन सातपुते, अनिल क्षीरसागर, कमलेश गुंदेचा, महेश अनमल, प्रविण गुंडू, नवनीत मुनोत, विशाल नातू आदींसह जिल्ह्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात राजेंद्र बलदोटा यांनी अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त हेमंत मेतकर यांनी अधिकार गाजवण्यापेक्षा सर्वांना मार्गदर्शनाची भूमिका ठेवली. सर्वांना सहकार्य केले. निष्कलंक असलेला व्यक्तीमत्व सेवानिवृत्तीनंतरही हवाहवासा वाटतो, हीच त्याने केलेल्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
दत्ता गाडळकर म्हणाले की, हेमंत मेतकर यांनी केमिस्ट बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम केले. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने अनेक केमिस्ट बांधव उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. कारवाई करण्यापेक्षा व्यवस्थित काम कसे करून घेता येईल? याकडे त्यांनी विशेष लक्ष देवून उत्तम प्रकारे काम करवून घेतले असल्याचे स्पष्ट करुन त्यांच्या भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.


अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे म्हणाले की, मेतकर यांनी सीनियर असून, सर्वांना बरोबर घेऊन काम केले. अधिकारी म्हणून अहंकारीवृत्ती न ठेवता, कार्यालयातील सर्वांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले. अधिकारी म्हणून नव्हे तर, उत्तम प्रशासक म्हणून काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सन्मान सोहळ्यात मेतकर यांचा सपत्निक जिल्हा, शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हेमंत मेतकर म्हणाले की, अहिल्यानगर मध्ये सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद आहे. उत्तमपणे केमिस्ट बांधवांचे सहकार्य मिळाले. सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवली. कारवाई केल्यानंतर अनेक चांगले मित्र बनले. 1997 सालापासून प्रशासनात असून, बुलढाणा जिल्ह्यात पहिली पोस्टिंग मिळाली. विविध ठिकाणी सेवा करुन अहिल्यानगर मध्ये काम करताना अडचण आली नाही, सर्वांचा प्रेमळ सहवास लाभला व काम करण्यास आणखी ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित धाडगे यांनी केले. आभार मनोज खेडकर यांनी मानले. यावेळी संजीव गुंदेचा, बाळासाहेब सोनवणे, नवनीत मुनोत, प्रवीण गुंडू, ऋषिकेश कुक्कडवाल, रामप्रसाद काळे, दत्तात्रय देशमुख, अविनाश साळुंके, प्रकाश मुथा, अजय घोडके, पोकळे विनीत, रीनुल गवळी, अजय घोडके, भूपेंद्र खेडकर, मनमोहन बहुरूपी, हर्षल अष्टेकर, दिलीप पालवे, मनोज बाफना, विनीत जाधव, झावरे, प्रणव जाधव, प्रणव अमले आदी केमिस्ट बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *