संस्थेचे नूतन पदाधिकारी व विश्वस्तांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी अशोक रमेश सब्बन यांची निवड करण्यात आली आहे. तर संस्थेवर नवीन अकरा विश्वस्त निवड नुकतीच करण्यात आली.
मंडळाचे विश्वस्त अशोक रमेश सब्बन यांची अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांनी सूचना केली. सर्व विश्वस्तांनी एकमताने त्यांच्या निवडीला पाठिंबा दिला. उपाध्यक्षपदी शंकर नारायण सामलेटी, सचिवपदी विनायक नरसिंग गुडेवार, सहसचिवपदी सविता प्रकाश कोटा, खजिनदारपदी संतोष दत्तात्रय बिज्जा, विश्वस्तपदी बाळकृष्ण बालय्या सिद्धम, राजू दत्तात्रय म्याना, भिमराज नारायण कोडम, स्नेहा श्रीपाद छिंदम, शंकर मल्लेशाम येमुल, विजय रमेश सामलेटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या नूतन पदाधिकारी व विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, श्रमिकनगर येथील मार्कंडेय विद्यालयाच्या (प्राथमिक) मुख्याध्यापिका विद्या दगडे, (माध्यमिक) मुख्याध्यापक शशिकांत गोरे आदींसह उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष अशोक सब्बन यांनी संस्थेच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने योगदान राहणार आहे. तर सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांनी या नूतन पदाधिकारी व विश्वस्त मंडळाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.