अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मारुती कापसे व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल निमगाव वाघा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि जिल्हा बँक नेप्ती उपबाजार समिती शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन मंगल फलके, संचालक अंशाबापू फलके, पोपट कापसे, अनिल फलके, संजय डोंगरे, अजय ठाणगे, बाळू जाधव, भाऊसाहेब केदार, जालिंदर आतकर, एकनाथ भुसारे, अतुल फलके, मीराबाई जाधव, जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी संजय सोन्नीस, दत्तात्रेय तिपोळे, बाळासाहेब साठे, सचिव विजय सोनवणे, अक्षय ठोकळ, वैभव पवार, सचिन ठोकळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोसायटीचे चेअरमन कापसे यांना आदर्श सोसायटी चेअरमन तर डोंगरे यांना क्रीडा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संजय सोन्नीस यांनी निमगाव वाघा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पध्दतीने कार्य सुरु आहे. तर डोंगरे यांनी क्रीडा क्षेत्रात चालना देऊन ग्रामीण भागात खेळाडू घडविण्यासाठी योगदान देत आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हे त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागातून चांगले खेळाडू पुढे येण्यासाठी विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तर सामाजिक उपक्रमातून विविध प्रश्न सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.