लोकशाही व राज्य घटनेवर घाला घालण्याचे काम सत्ताधारी करत आहे -मोसीम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस डॉक्टर सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी डॉ. फैजान इनामदार व युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी तौफिक शेख यांची नियुक्ती करण्यात आली. मुकुंदनगर येथे झालेल्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख यांनी इनामदार व शेख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी काँग्रेसचे अल्पसंख्यांकचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निजाम जहागीरदार, बाळासाहेब भंडारी, शामराव वागस्कर, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक सागर इरमल, सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख, उपाध्यक्ष नवाज शेख, डॉ. तौफिक अन्सारी, रियाज शेख, डॉ. असलम शेख, अस्लम इनामदार, नवाज शेख, समीर शेख, सचिन जाधव, सागर शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अशोक गायकवाड, भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण गायकवाड, समीर पठाण, अल्ताफ पठाण, अब्बास सय्यद, आयन शेख, मातीन शेख, उजेर सय्यद, अजहर शेख, अनिस शेख, सोहेल शेख, फरीद शेख, आवेज सय्यद, नवेद शेख, खलील सय्यद, सोहेल सय्यद, मतीन शेख आदी उपस्थित होते.
निजाम जहागीरदार म्हणाले की, मुकुंदनगर भाग हा नेहमीच काँग्रेसच्या पाठिशी उभा राहिला आहे. मोठ्या प्रमाणात असलेला युवक काँग्रेसशी जोडला जात आहे. काँग्रेस पक्षाने सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. युवा नेतृत्वांना पक्षाच्या माध्यमातून संधी मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मोसीम शेख म्हणाले की, राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, जातीयवादी शक्तींना धडा शिकवण्यासाठी सर्व समाजाला एकवटावे लागणार आहे. लोकशाही व राज्य घटनेवर घाला घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहे. सत्ताधारी पक्ष हे जातीयवादी विचारसरणीतून सत्ता राबवीत असताना, अल्पसंख्यांक समाजाला गुलाम म्हणून वागवित आहे. यासाठी युवकांनी संघटित होऊन समाजातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसच्या पाठिशी शक्ती उभी करण्याचे त्यांनी आवाहन केले.