दहा वर्षे युवा कार्याध्यक्ष म्हणून सांभाळली जबाबदारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी विनोद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संग्राम जगताप व चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार संग्राम जगताप यांनी चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मार्गी लावून समाजबांधवांना आधार दिला जात आहे. समाजातील प्रश्न सोडवून युवक-युवतींना दिशा देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या चर्मकार विकास संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
विनोद कांबळे युवा उद्योजक असून, चर्मकार विकास संघाच्या युवा कार्याध्यक्ष म्हणून मागील दहा वर्षापासून प्रामाणिकपणे कार्य करत आहे. समाजातील युवकांना जोडून कष्टकरी, गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले. या नियुक्तीबद्दल कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.