माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. तनवीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शेख यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहरात झालेल्या काँग्रेसच्या महासंकल्प मेळाव्यात शेख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी खासदार निलेश लंके, हेमंत ओगले, करन ससाणे, जयंत वाघ, अण्णासाहेब शेलार, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख, शामराव वागस्कर, बाळासाहेब भंडारी, अभिजीत कांबळे, भुषण चव्हाण, अकदस शेख, सागर इरमल, नवाज शेख, सुरेश झावरे, जमीला शेख, साहेबराव चौधरी, अनिल वराडे, शिरीन बागवान, इरशाद शेख, पूजा लोखंडे आदींसह युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. तनवीर शेख मागील चार वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रीयपणे कार्य करत आहेत. महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
ना. थोरात यांनी शेख यांचे अभिनंदन करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील घोटाळे हे मोठे प्रश्न असून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक-युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे तनवीर शेख यांनी स्पष्ट करुन युवकांचे संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीकोनाने कार्य करण्याची भावना व्यक्त केली. समाजातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना संधी देण्याचे काम केले जात असल्याचे मोसीम शेख यांनी सांगितले.