महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व त्यांच्या हक्काची जपणुक करण्याचे काम केले जाणार -राजेंद्र काळे
नगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या समीना मोसिन पठाण यांची मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, शहर जिल्हाध्यक्ष अशोक भोसले व शहर उपाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पठाण यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शहर संघटक पोपट भोसले, नितीन चव्हाण, महेश भोसले, संजय अडागळे, रणसिंग मास्तर, सलिम मिर्झा, नामदेव अडागळे, सावित्री भोसले, मनीषा लोखंडे, वर्षा चांदणे, डॅनियल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे म्हणाले की, मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न सोडविण्याचे सातत्याने कार्य सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून महिला व बालकांचे प्रश्न देखील सोडविण्याचे कार्य सुरु असून, महिलांचे प्रश्न गंभीर बनत असताना, त्याला वाचा फोडण्याचे व त्यांच्या हक्काची जपणुक केली जाणार आहे. यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शहर जिल्हा महिला अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक भोसले व दिलीप जाधव यांनी महिलांना संघटित करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य समीना पठाण करणार असल्याची भावना व्यक्त करुन त्यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समीना पठाण यांनी महिलांचे विविध प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक परिसरातून महिलांना संघटनेशी जोडले जाणार असून, त्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला जाणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.