• Wed. Nov 5th, 2025

सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती

ByMirror

Nov 6, 2023

चिंतन बैठकीत झाली निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भिंगार येथे झालेल्या सकल माळी समाज ट्रस्टच्या चिंतन बैठकीत फुले यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या निवडीबद्दल फुले यांचा जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे भिंगार नूतन शाखा अध्यक्ष विठ्ठल दळवी, कॅप्टन सुधीर पुंड, अमोल भांबरकर, भानुदास बनकर, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब भुजबळ, मच्छिंद्र बनकर, ॲड. राहुल रासकर, लवेश गोंधळे, रोहीत पठारे, चंद्रकांत पुंड, डॉ. रणजीत सत्रे, अनिल इवळे आदींसह नगर तालुक्यातील पदाकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे म्हणाले की, सकल माळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून माळी समाज एकवटत आहे. प्रामाणिक समाजकार्यामुळे ग्रामीण भागातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. संघटना बांधणी उत्तमपणे सुरु असून, समाजात कार्यरत युवकांना विविध पदाच्या माध्यमातून जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.

नेप्ती (ता. नगर) येथील रामदास फुले मागील 25 वर्षापासून समाजात विविध क्षेत्रात कार्य करत आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात त्यांचे निस्वार्थपणे योगदान सुरु आहे. समाजातील विविध प्रश्‍नांवर आवाज उठवून दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याचे त्यांचे कार्य सुरु असून, या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


सत्काराला उत्तर देताना रामदास फुले म्हणाले की, राजकारण बाजूला ठेऊन समाजकारण हा एकमेव ध्येय समोर ठेऊन सकल माळी समाज ट्रस्टचे कार्य सुरु आहे. समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा सुरु आहे. या कार्यात सर्वांना बरोबर घेऊन व एकजुटीने समाजाचा विकास साधण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. तर पदाच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविण्यास प्राध्यान्य देऊन कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल फुले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *