छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
नगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शहरातील अनुराधा मिश्रा यानी उत्कृष्ट कामगिरी करुन चार सुवर्ण पदक पटकाविले. तसेच द्रोणागिरी क्रीडा महोत्सवनिमित राज्यस्तरीय ओपन बेंच प्रेस डब्ल्यू ओपन डेडलिफ्ट स्पर्धेत डेडलिफ्ट या प्राकारत मिश्रा यांनी कास्य पदक प्राप्त केले.

या स्पर्धेत राज्यातील महिला खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पॉवरलिफ्टिंग मध्ये मिश्रा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन पदकाची कमाई केली. या कामगिरीबद्दल मिश्रा यांची छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. मिश्रा यांना नुकतेच झालेल्या सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे, राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
