• Tue. Mar 10th, 2026

अनुराधा मिश्रा यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून सत्कार

ByMirror

Aug 1, 2025

अनिक्विपेटेड पॉवरलिफ्टिंग ॲण्ड बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकाविले चार सुवर्ण पदक

नगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच मुंबई, उरण येथे घेण्यात आलेल्या अनिक्विपेटेड पॉवरलिफ्टिंग ॲण्ड बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील अनुराधा मिश्रा या महिला खेळाडूने चार सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शैलेश गवळी आदी उपस्थित होते.


या स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस मध्ये मिश्रा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन दोन्ही प्रकारात प्रत्येकी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची जमशेदपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी मिश्रा यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *