गुलमोहर रोडवरील पारिजात चौकात विजयदुर्ग लक्झरी फ्लॅट्स प्रकल्पाचा शुभारंभ
वाड्यांपासून फ्लॅट संस्कृतीपर्यंतचा प्रवास म्हणजे शहरीकरणाचे प्रतीक -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील पारिजात चौकात विजयदुर्ग या 3 बीएचके लक्झरी फ्लॅट्स प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य सुनील रामदासी, उद्योजक गोपाल धूत, दशरथलाल बिहानी, अमित गटणे, करण भळगट, राजूशेठ चोपडा, गिरीश कुलकर्णी, आदेशजी चंगेडिया, भैय्या गंधे, सचिन बारस्कर, सुदाम देशमुख, प्रकाश भळगट, किशोर बिहाणी, विजय बिहाणी, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सचिन जगताप, सुमित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अहिल्यानगरीत विजयदुर्ग हा नवीन वास्तू प्रकल्प शहराच्या विकासात भर घालणार आहे. जसा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडतो आहे, तसा विकसित अहिल्यानगर घडविण्यासाठी अशा उंच आणि सुसज्ज वास्तूंची गरज आहे. केवळ रस्ते व नागरी सुविधा पुरवल्या म्हणून शहराचे सर्वांगीन रूपांतर होत नाही. उंच इमारती शहराच्या ओळखीला वेगळे परिमाण देतात. वाड्यांपासून फ्लॅट संस्कृतीपर्यंतचा प्रवास म्हणजे शहरीकरणाचे प्रतीक असून, हा बदल आपल्या नगरच्या वाढत्या प्रगतीकडे निर्देश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले की, अहिल्यानगरसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक शहराने शिक्षण, उद्योग आणि व्यापारात नेहमीच वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या शहराला शहरी विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी अशा आधुनिक निवासी प्रकल्पांची गरज आहे. हा प्रकल्प केवळ रहिवाशांना आलिशान सोयी-सुविधा देणारा नाही, तर तो शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीलाही चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शहरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून विजयदुर्ग प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे स्वागत अमित गटणे यांनी केले. आभार करण भळगट यांनी मानले.