साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा घ्यावी -ॲड. महेश शिंदे
नगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज आहे. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून व शाहिरीतून समाज प्रबोधनाचे कार्य केले. सामाजिक संस्थांनी देखील अण्णा भाऊंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्य केले पाहिजे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि अन्याय निवारणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जय युवा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी केले.
मेरा युवा भारत व जय युवा अकॅडमीच्या वतीने शहरातील लालटाकी परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. शिंदे बोलत होते.
प्रारंभी सिध्दार्थनगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचे विनोद साळवे, नितीन गोरडे, मुंबादेवी प्रतिष्ठानचे सुभाष काकडे, माहेर संस्थेच्या रजनीताई ताठे, ॲड. दिनेश शिंदे, उडाणच्या आरती शिंदे, प्रा. साठे सर, हजरत शेख, दत्ता वामन आदी उपस्थित होते.