राजकारण व समाजकारणात सक्रीय राहून शिवसैनिकाने व्यावसायिक जीवनात मिळवलेले यश अभिमानास्पद -खा. अनिल देसाई
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांची उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल मुंबई येथे शिवसेना भवनमध्ये खासदार तथा पक्षाचे सचिव अनिल देसाई व माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा सत्कार केला.
खासदार अनिल देसाई म्हणाले की, राजकारण व समाजकारणात सक्रीय राहून शिवसैनिकाने व्यावसायिक जीवनात मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. लहामगे यांनी टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या राज्य पातळीवर संघटनेत मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे त्यांनी सांगितले. तर पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार विनायक राऊत यांनी राजकारण व समाजकारण करताना व्यावसायिक जीवनात लहामगे यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. शिवसेनेचे पदाधिकारी विविध क्षेत्रात नावलौकिक कमवत असल्याचा आनंद होत असल्याची भावना व्यक्त करुन लहामगे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
शिवसेनेत प्रामाणिकपणे काम सुरु आहे. पक्षात काम करताना संघटन कौशल्य विकसीत झाले. याच कार्याची दखल घेऊन राज्यपातळीवर जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. व्यावसायिक क्षेत्रातही काम करताना पक्षाची साथ मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
