शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रीतीज पाठशाळेचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक
नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रीतीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल इट वेल या आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इंग्रजी भाषेतील विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह व त्याचे योग्य स्पेलिंग अवगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.

वाडियापार्क येथील श्री विद्या निकेतन मध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक चंचल खितानी, अनिता गंभीर, भावना शिंगी, तन्वी शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रीतीज पाठशाळेच्या संस्थापिका प्रीती मुथियान, पाठशाळेच्या सोनिया घंगाळे, शीतल मुनोत, रिना मुनोत, खुशी डागा, चारुशीला शिंदे, प्रगती व्यवहारे, रुशिता गुजराती आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रीती मुथियान यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जाण्याची सवय होण्यासाठी व इंग्रजीतील स्पेलिंगची योग्य माहिती होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सह संस्थापक चेतन मुथियान यांनी उपस्थित पाहुणे व पालकांचे स्वागत केले. या स्पर्धेदरम्यान पालकांसाठी मुलांच्या स्पेलिंग सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
एल.के.जी ते इयत्ता 5 वी पर्यंतच्या गटामध्ये चुरशीच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत शहर व उपनगरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. तोंडी व लेखी पध्दतीने पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखवली.
एल.के.जी. गटात प्रथम- यशवर्धन सुद्रिक, द्वितीय- तन्वी गट, तृतीय- युगंधरा सुद्रिक, उत्तेजनार्थ- रिधन अडसुरे, श्रेयांश कटारिया, रुद्रांश शमा. यु.के.जी. गटात प्रथम- अंश तलरेजा, द्वितीय- दिव्यन नवलानी, तृतीय- लब्धी डागा. उत्तेजनार्थ- आराध्या झलते, कबीर शाह, परनीत कौर, हीना तलरेजा. इयत्ता 1 ली च्या गटात प्रथम- प्रारब्धी मंत्री, द्वितीय- सान्वी अग्रवाल, तृतीय- इहान बच्छावत. इयत्ता 2 री च्या गटात प्रथम- रियांश धानोरकर, द्वितीय- भाव्या संचेती. इयत्ता 3 री च्या गटात प्रथम- कियान खत्ती, द्वितीय- वरद सुपेकर. इयत्ता 4 थी च्या गटात प्रथम- अर्णवी चव्हाण, द्वितीय- समृद्धी झीने. इयत्ता 5 वी च्या गटात प्रथम- तनिष्क रापरिया, द्वितीय- अनय कर्णावट यांनी बक्षिसे पटकावली.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मेडल आणि फन की लॅण्डचे 50 टक्के सवलतीचे कूपन देण्यात आले. स्पर्धेदरम्यान पालकांसाठी विशेष अर्हम पुरुषाकार ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या ध्यानसाधनेचा उद्देश पालकांचे आरोग्य सुधारणे, एकाग्रता वाढवणे आणि मानसिक शांतता प्रदान करणे हा होता. ध्यानाच्या माध्यमातून उत्तम विचारसरणी, तणावमुक्त जीवन आणि सकारात्मक उर्जेचा संचार कसा होतो? याबद्दल पालकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या स्पर्धेसाठी राहुल कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.