• Wed. Oct 15th, 2025

भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये भरले देश-विदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटांचे प्रदर्शन

ByMirror

Nov 16, 2024

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी जतन केलेला ठेवा

चलनांचा अनमोल ठेवा भावीपिढींला माहिती देणारा ठरणार -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी स्वत:कडे जतन केलेल्या देश-विदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटांचा अनमोल खजिना पाहण्यासाठी नागरिकांना खुला केला होता. प्रदर्शन पाहण्यासाठी हरदिनच्या सदस्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रुपचे सदस्य असलेले अरविंद ब्राह्मणे यांनी देश-विदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटा जतन करण्याचा लहनपणापासून छंद जोपासला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्मिळ भारतीय आणि विदेशी चलनातील नाणे आणि नोटांचा ठेवा जमा केला आहे. त्यांच्याकडे असलेला हा ठेवा भिंगार मधील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता.


अतिशय जुन्या पध्दतीचे चलनी नाणे व नोटांचा अनमोल खजिना नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अरविंद ब्राह्मणे, रमेशराव वराडे, दीपक अमृत, मेजर दिलीप ठोकळ, दिलीपशेठ गुगळे, दीपक धाडगे, सर्वेश सपकाळ, रमेश साके, मनोहर दरवडे, संजय भिंगारदिवे, सुधीर कपाले, अभिजीत सपकाळ, जहीर सय्यद, मुन्ना वाघस्कर, अशोक पराते, विठ्ठल राहिंज, सुभाष पेंढुरकर, विलास आहेर, अविनाश जाधव, दिनेश शहापूरकर, अनिलराव सोळसे, संतोष हजारे, सागर भुजबळ, अजेश पुरी, तुषार धाडगे गुरुजी, अनंत सदलापूरकर, महेश गोंडाळ, नामदेवराव जावळे, सीताराम परदेशी, रामनाथ गर्जे, एकनाथ जगताप, अविनाश पोतदार, कुमार धतुरे, सुभाष त्रिमुखे,महेश गोंडाळ, राजू कांबळे, विकास निमसे, सूर्यकांत कटोरे, संजय नायडू, सुहास देवराईकर, सुनील कसबे, योगेश हळगावकर, किशोर भगवाने, विनोद खोत, अशोक भगवाने, संतोष लुनिया, रमेश कोठारी, प्रकाश देवळालीकर, विशाल भामरे, राहुल भिंगारदिवे, संजय शिंगवी, विजय पाखरे, कैलास भिंगारदिवे, देविदास शिंदे आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपमध्ये सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून, त्यांच्या कला-छंद यांना प्रोत्साहन देण्याचे काम ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे. आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचे काम सुरु असताना सामाजिक कार्य देखील सुरु आहे. ब्राह्मणे यांनी दुर्मिळ नाणी आणि नोटांचा जमा केलेला ठेवा कौतुकास्पद आहे. हा अनमोल ठेवा भावीपिढींना विविध चलनांची माहिती देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. अरविंद ब्राह्मणे यांनी दुर्मिळ नाणी आणि नोटांचा ठेवा जतन करण्याची आवड लहानपणापासून असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा संचय करण्यात आला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक झालेली असून, हे नागरिकांसाठी ऐतिहासिक ठेवा असणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *