बैठका व प्रचार सुरु
आ. जगताप यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले -अमित काळे
नगर (प्रतिनिधी)- महायुतीत घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने भिंगार शहरात नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ बैठका व प्रचार सुरु करण्यात आला आहे. भिंगार येथील रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते आ. जगताप यांना निवडून आणण्यासाठी एकवटले असून, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करणारे आ. जगताप यांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी जनतेला आवाहन करण्यात आले.
भिंगार येथील पंचशील नगर मध्ये भिंगार शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, आरपीआयचे अमित काळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनिल काळे, ज्येष्ठ नेते सुनिल शिंदे, आरपीआयचे नाना पाटोळे, मंगेश मोकळ, महेश भिंगारदिवे, गौतम कांबळे, दया गजभिये, विक्रम चौहान, सुजित घंगाळे, माजी सरपंच युवराज पाखरे, सिध्दार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, अंकुश मोहिते, रुपचंद छजलाने, सोनू माघाडे, पूजा पाठक, शारदा ठाकूर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरेश बनसोडे म्हणाले की, आंबेडकरी समाजाला सन्मान व न्याय देण्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी केले. शहरात त्यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जात आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शहरात इतर महापुरुषांचे पुतळे देखील उभारले. भिंगारमध्ये देखील समाजबांधवांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आ. जगताप यांच्या प्रयत्नाने उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित काळे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी केले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी ते धावून आले आहेत. आंबेडकरी समाजाचा सन्मान वाढवून त्यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम केले. त्यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नसून, सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन शहर व उपनगरांचा विकास साधला असल्याचे स्पष्ट केले. सुनील शिंदे यांनी आ. जगताप यांनी शहराला विकासाचे व्हिजन दिले असून, त्याप्रमाणे विकासात्मक कामे मार्गी लागत आहे. ते पुन्हा आमदार झाल्यास शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले.