• Tue. Mar 10th, 2026

एकाच दिवशी फेरफार भरुन त्याच दिवशी मंजूरी दिल्याचा आरोप

ByMirror

Dec 16, 2024

तत्कालीन केडगाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन निलंबनाची मागणी

जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

नगर (प्रतिनिधी)- अधिकाराचा गैरवापर करुन बेकायदेशीरपणे खोटे बनावट आदेश तयार करणारे व सन 2021 मध्ये एकाच दिवसात फेर भरून तो मंजूर करणाऱ्या केडगावच्या तत्कालीन कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून, विभागीय समितीच्या वतीने चौकशी व्हावी व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची तक्रार पंढरीनाथ साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


2021 मध्ये केडगाव तलाठी यांनी 12 जुलै 2021 रोजी फेरफार भरून त्यामध्ये मंडळ अधिकारी यांच्याकडील 9 जुलै 2021 चा खोटा व बनावट आदेश नमूद करून खरेदीखत दस्त नोंद सदर तलाठी यांनी बेकायदेशीरपणे आदेश व दस्तऐवज या नोंदीच्या प्रकारातून भरून मंडळ अधिकारी यांच्याकडील खोटा बनावट आदेश नमूद करून सदर तलाठी व तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी बेकादेशीरपणे सदरचा फेर क्रमांक 62642 एकाच दिवसात म्हणजेच 12 जुलै 2021 रोजी मंजूर केलेला असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.


सदर नोंद प्रकरणी कामगार तलाठी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1948 यांचे कलम 150 उपकलम दोन नुसार कारवाई करणे आवश्‍यक होती. परंतु त्यांनी अशी कोणतीही कारवाई न करता नियम धाब्यावर बसवून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कायदेशीर अधिकार नसताना भ्रष्टाचार व आपल्या पदाचा गैरवापर करून खोटा आदेश तयार करून सदरची फेरफार नोंद मंजूर केली आहे.


तलाठी यांनी फेरफार क्रमांक 62467 घेऊन मंडळ अधिकारी यांच्याकडे खोटा बनावट आदेश फेरफार मध्ये नमूद केला आहे. तलाठी यांनी 30 जून 2021 रोजी घोषणापत्र या दस्ताची नोंद मंडळाधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून बेकायदेशीर मार्गाने त्याच दिवशी 30 जून 2021 रोजी मंजूर केलेला आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना एका दिवसात फेर भरून तो मंजूर करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना खोटा बनावट आदेशान्वये एका दिवसात फेरफार क्रमांक 62642, 62465 व 62467 या फेरफार नोंदी एकाच दिवशी भरुन त्याच दिवशी बेकायदेशीरपणे मंजूर केल्या असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर प्रकरणात तत्कालीन कामगार तलाठी, तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी बनावट आदेश तयार करणे, बनावट आदेश नोंदीसाठी नंबर घेऊन वापरणे, शासनाची फसवणूक करणे व लोकसेवकांकडून करण्यात येणारे हे गंभीर गुन्हे असून, या प्रकरणाची विभागीय समिती मार्फत चौकशी व्हावी, सदरील दोषींवर तत्काल निलंबनाची कारवाई करुन त्यांना बडतर्फ करावे व गुन्हे दाखल करण्याची मागणी साबळे यांनी केले आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *