कल्याणकारी योजना व राष्ट्रवादीची ध्येय धोरणांचा सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसार सुरु -मारुती पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी अजित यशवंतराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नगर शहर सोशल मीडिया विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यशवंतराव यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अख्तार शेख, किशोर शेलार, प्रमोद जाधव आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुती पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकांना विविध पदाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी मिळत आहे. शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरु आहे. सरकारच्या विविध कल्याणकारी योजना व राष्ट्रवादीची ध्येय धोरणे जनसामान्यां पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचविण्याचे कार्य सुरु आहे. अजित यशवंतराव यांची झालेली नियुक्ती अभिनंदनीय असून, सर्व सोशल मीडियाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एकजुटीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.