• Sun. Mar 16th, 2025

अहमदनगर उर्दू हायस्कूलच्या शिक्षिका परवीन खान यांचा कर्तृत्ववान महिला पुरस्काराने गौरव

ByMirror

Mar 16, 2025

नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्टच्या वतीने सत्कार

नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका परवीन फैसल खान यांना ठाणे येथील मातृसेवा फाउंडेशन आणि शिक्षक ध्येय यांच्या वतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. खान यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


परवीन खान यांना नुकताच सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सचिव रेहान काझी व खजिनदार वाजिद खान यांनी त्यांचा सत्कार केला. विविध क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मातृसेवा फाउंडेशन व शिक्षक ध्येय यांच्या वतीने महिला दिनानिमित्त राज्यातील 34 महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.


परवीन खान या अहमदनगर उर्दू हायस्कूल मध्ये प्राथमिक विभागात शिक्षिका असून, अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी त्या विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहारिक, व्यावसायिक ज्ञान मिळण्यासाठी व त्यांच्या शिक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या योगदान देत आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व विश्‍वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *