अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी कैलास उर्फ पप्पू गर्जे यांची निवड करण्यात आली. सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत गर्जे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
तालीम संघाचे शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे यांनी गर्जे यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी शहर उपाध्यक्ष विलास चव्हाण, कार्याध्यक्ष अजय आजबे, सचिव मोहन हिरणवाळे, सहसचिव सुनील भिंगारे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे, श्रीरामपूरचे अध्यक्ष दीपक डावखर, जामखेड तालुका अध्यक्ष श्रीधर मुळे, नेवासा तालुका तालीम संघाचे सचिव संभाजी निकाळजे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष पप्पू शिरसाठ, गणेश जाधव, भारत शिंदे, सुनील खपके, सुरेश होन, आबा बडाख, अशोक साळुंके, गोकुळ शिंदे, अशोक पानकडे, संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.
पै. नामदेव लंगोटे यांनी शहरासह जिल्ह्यात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. विविध कुस्ती स्पर्धा घेवून खेळाडूंना चालना दिली जात आहे.
नूतन पदाधिकारी देखील कुस्ती खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कैलास उर्फ पप्पू गर्जे यांनी शहरात कुस्ती खेळाला व मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
