फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करु इच्छिणाऱ्यांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षक व खेळाडूंसाठी डी परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डी परवाना प्राप्त करणारे अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना घडविण्यासाठी सज्ज होणार आहे. फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करु इच्छिणाऱ्यांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे सचिव रौनप फर्नांडिस यांनी केले आहे.
अहमदनगर महाविद्यालयातील फुटबॉलच्या मैदानावर 17 जुलै ते 21 जुलै या कालावधीत डी परवाना शिबिर होणार आहे. या शिबिरात फुटबॉल मधील तज्ञ व्यक्ती या खेळातील नियम, अटी, खेळातील बारकावे, गुण पध्दती, खेळाडूंमध्ये कौशल्य निर्माण करणे आदी फुटबॉल खेळाशी संबंधीत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी 12 जुलै पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिरासाठी मर्यादीत जागा असून, प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपली नावे निवड समितीच्या वतीने कळविली जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी प्रदीप जाधव 9422227599 आणि रौनप फर्नांडिस 9890549981 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
