अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला नुकतीच मान्यता देण्यात आली. अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला अधिकृतपणे विविध शरीर सौष्ठव स्पर्धा व बॉडी बिल्डिंग प्रशिक्षण आणि इतर उपक्रम घेता येणार आहे.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी शहरातील सिंग रेसिडेन्सी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष मयूर दरंदले यांना मान्यतेचे पत्र दिले. यावेळी महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव राजेंद्र चव्हाण, शरद मारने, अहमदनगर असोसिएशनचे सचिव कैलास रनसिंग, खजिनदार प्रतिक पाटील, उपाध्यक्ष सतीश रासकर, राहुल कुलकर्णी, डेव्हिड मकासरे, शब्बीर सय्यद आदी उपस्थित होते.
प्रशांत पाटील यांनी युवा पिढीला व्यवसनापासून रोखण्यासाठी व शारीरिक सदृढतेसाठी बॉडी बिल्डिंगद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. विविध स्पर्धेच्या माध्यमातून बोडी बिल्डर्स पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. मयूर दरंदले यांनी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे आभार माणून लवकरच शहर व जिल्ह्यात भव्य स्वरुपात बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला.
