आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ लोणावळा येथे रवाना; रत्नागिरी जिल्ह्याविरुद्ध रंगणार पहिला सामना
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचा 20 वर्षाखालील फुटबॉल संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाची निवड भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर नुकतेच पार पडलेल्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरातून झाली आहे. या निवड चाचणीत 50 हून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभला होता.
निवड चाचणीत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या 20 वर्षाखालील फुटबॉल संघात कर्णधार- रुषभ गोपाळ मणी, अभिवाचन सोनाजी थोंबे, आदित्य राजेश तळेकर, अक्षय नान्दू कोटकर, अम्मार शेख, अर्मान शेख, यश गोकुळ कोतकर, जिनेश संतोष छल्लाणी, जॉय पंकज शेलळे, मंथन मनोज कदम, ओम राहुल म्हस्के, पियुष विष्णू भोसले, रोहित प्रमोद पवार, साहिल राजू उर्मुडे, साहिल संतोष कुसळकर, स्वराज राजाभाऊ वाघमारे, उत्कर्ष मनीष सोनवणे, वेदांत नितीन दिकोंडा या खेळाडूंचा समावेश आहे.
लोणावळा (जि. पुणे) येथे होणाऱ्या 20 वर्षाखालील आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा होणार असून, अहिल्यानगर जिल्ह्याचा पहिला सामना 11 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्याविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी संघाचे खेळाडू रवाना झाले आहेत. संघाचे मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून विक्टर जोसेफ काम पाहत असून, त्यांना अभिषेक सोनवणे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून साथ देत आहेत.
या निवड चाचणीसह खेळाडूंना प्रशिक्षण व स्पर्धेला पाठविण्यासाठी संपूर्ण नियोजनात अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव रोनाप फर्नांडिस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. खेळाडूंच्या निवडीपासून ते त्यांच्या नोंदणी व संघ बांधणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मोलाचे योगदान लाभले. असोसिएशनचे कार्यकारी सदस्य रिषपालसिंग परमार, जोगासिंग मिन्हास व प्रदीप जाधव यांनीही संघाच्या व्यवस्थापनासाठी मोलाचे सहकार्य केले. खालिद सय्यद आणि राजू पाटोळे यांनी मैदानावर राहून संघाला मार्गदर्शन केले.
असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी संघाला शुभेच्छा देऊन जिल्ह्यातील युवा खेळाडूंकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली.