• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

ॲड. भावना आहुजा-नय्यर एलएल.एम. परीक्षेत पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

ByMirror

Apr 8, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲड. भावना जनक आहुजा यांनी एलएल.एम. परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.


ॲड. भावना आहुजा हिने 2019 मध्ये शहरातील न्यू लॉ कॉलेज मधून एल.एल.बी. पूर्ण केले असून, त्यावेळी देखील ती महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमाक पटकाविला होता. तिला एल.एल.बी. साठी प्राचार्य एम.एम. तांबे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

तर एलएल.एम. परीक्षेसाठी तिला ॲड. सुभाष काकडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ॲड. भावना या उद्योजक जनक आहुजा यांची कन्या तर उद्योजक अभिमन्यू नय्यर यांच्या पत्नी आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *