विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून सत्कार
पुण्यातील नामांकित कंपनीत निवड
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या वतीने मे 2024 मध्ये घेण्यात आलेली सीए फायनल परीक्षेत मध्ये कु. अदिती माणकेश्वर यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल तिचे विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून सत्कार करण्यात आला.
अदिती हिचे शालेय शिक्षण सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर येथे झाले आहे. शाळेत देखील तिने प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकाविलेला आहे. तिचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात झाले. बी.कॉम आणि नंतर एम.कॉम या दोन्ही पदव्यामध्ये त्यांनी पुणे विद्यापीठात विशेष श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान देखील पटकावला आहे.
तिला शैक्षणिक वाटचालीत बीएड कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक शरद दत्तात्रय माणकेश्वर आणि जिल्हा परिषदेमधील निवृत्त प्राध्यापिका शैलजा शरद माणकेश्वर या आजी-आजोबांचे मार्गदर्शन लाभले. एमआयडीसी येथील लार्सन ॲण्ड टुब्रोचे व्यवस्थापकीय संचालक संतोष माणकेश्वर, उद्योजिका अर्चना माणकेश्वर यांच्या त्या कन्या आहेत. आई आणि वडील दोघेही इंजिनियर असल्याने त्यांच्याकडून सीए करण्यासाठी तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे बंधू शौनक माणकेश्वर यांनी बी.टेक पूर्ण करून नुकतेच एम.एस. करण्यासाठी जर्मनीला गेले आहे.
शहरातील चार्टड अकाउंटंट राजेंद्र काळे यांच्याकडे अदिती हिने आर्टिकलची प्रॅक्टिस पूर्ण केली आहे. प्रशिक्षण काळामध्ये तिने अतिशय उत्कृष्ट काम करून विशष नैपुण्य मिळवले आहे. सीए परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली असता, तिची पुण्यामधील 110 वर्षे जुनी शार्प ॲण्ड टेनन या कंपनीत निवड झाली आहे. या यशाबद्दल अदिती माणकेश्वर हिचे सीए राजेंद्र काळे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स, आय लव्ह नगर, देसरडा ॲण्ड भंडारी अकॅडमी, लार्सन ॲण्ड टुब्रो, लायन्स इंटरनॅशनल, शार्प ॲण्ड टेनन, दुर्गामाता ओंकार कॉलनी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.