एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखाल झाला होता गुन्हा
नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशनला 11 फेब्रुवारी 2018 मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व त्यातून तिला झालेली गर्भधारणाच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पीडितेने तिच्या आईला आरोपीने तिच्यावर बलात्कार केलेली घटना सांगितली. त्यावेळेला पीडीतेच्या आईने पिडीतेची गरोदरपणाची चाचणी केली, त्यावेळेला पिडीतेला व तिच्या आईला पीडिता ही बलात्कारामुळे गरोदर असल्याची खात्री पटली. त्यानंतर पिडीतेच्या आईने एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी विरुद्ध बलात्काराची फिर्याद दाखल केली. त्यानुसार तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला, त्यानुसार पीडीतेचा व तिच्या गर्भाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी घेतले. कायद्याचे तरतुदीनुसार तिचा गर्भपात करण्यात आला.
त्या दरम्यान आरोपी हा तिथून पळून गेलेला आहे, असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी याला त्याच्या फोनच्या लोकेशन वरून अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले. हे सर्व नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार आरोपी आणि पीडिता हे त्याच गर्भाचे आई व वडील आहे, असे मत फॉरेन्सिक एक्सपर्ट यांनी नोंदविले. तपासी अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध बलात्कार तसेच पोस्को कायद्याच्या तरतुदीनुसार दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
यानंतर आरोपी याने त्याच्या तर्फे ॲड. परिमल फळे यांची सदर केस चालविण्या कामी नेमणूक केली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी एकूण 18 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. त्यामध्ये पीडीतीची साक्ष, फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांची साक्ष तसेच डॉक्टरांची साक्ष सर्वात महत्त्वाची होती. त्यानंतर पीडीतेची ऑस्सिफिकेशन म्हणजेच हाडांची टेस्ट करण्यात आली. अशा प्रकारच्या टेस्ट या पीडितेचे वय सिद्ध करण्याकामी केल्या जातात. त्यानंतर या सर्व साक्षीदारांच्या आरोपीतर्फे ॲड. परिमल फळे यांनी उलट तपास घेतले. त्यामध्ये पीडितेचा घेतलेला उलटतपास व पाच तसेच ऑस्सिफिकेशन टेस्ट केलेला एक्सपर्ट यांचा घेतलेला उलट तपास सर्वात महत्त्वाचा ठरला. त्यानुसार ॲड. फळे यांनी आरोपी विरुद्ध हा गुना सिद्ध करण्याकामी सरकारी पक्षाकडे कुठलेही ठोस पुरावे नसल्याचा बचाव घेतला. त्या अनुषंगाने ॲड. फळे यांनी साक्षीदारांचे घेतलेले उलटतपास व न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश एम.एच. मोरे मॅडम यांनी ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यासाठी ॲड. परिमल फळे यांना ॲड. आनंद कुलकर्णी, ॲड. निखिल मुसळे, ॲड. प्रतीक ढमढेरे यांचे सहकार्य लाभले.