• Thu. Apr 24th, 2025

बलात्कारप्रकरणातील आरोपी सहा महिने उलटूनही मोकाट;

ByMirror

Apr 21, 2025

पीडित महिलेचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोमवारी (दि. 21 एप्रिल) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या आंदोलनास बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. उपोषणात बसपाचे सुनिल ओव्हळ, सिंधुबाई जाधव, संजय जाधव, कचरू लष्करे, राजू शिंदे, शहानवाज शेख यांच्यासह पीडित महिलेचे कुटुंबीय सहभागी झाले होते.


श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अविनाश कोठावळे (रा. कोठावळे सांगवी, ता. पारनेर) याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेसोबत सहा महिने राहून तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होऊन सहा महिने उलटूनही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आरोपीस त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *