जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार; 51 पिंपळाची झाडांची लागवड
शहीद जवानांच्या स्मृती कायम वृक्षाच्या रुपाने हिवरेबाजारमध्ये राहणार -पद्मश्री पोपटराव पवार
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरेबाजार येथे एक पेड शहिदों के नाम! अभियान राबविण्यात आले. शहीद सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावून त्यांच्या आठवणी जिवंत ठेऊन भावी पिढीला देश निष्ठेची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष गर्जे, वीर माता गोधाबाई नरवडे, सरपंच विमल ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, कुलकर्णी, चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत भगत, त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, संजय म्हस्के, जय हिंदचे शिवाजी गर्जे, भगवान डोळे, एकनाथ माने, उद्योजक अंबादास कांडेकर, निवृत्ती भाबड, अशोक मुठे, कॅप्टन बशीर शेख, विठ्ठल नरवडे, बबन उरमुडे, मारुती ताकपिरे, आबासाहेब कांडेकर, चंद्रकांत शिंदे, निळकंठ उल्हारे, सचिन दहिफळे, नंदू पालवे, कुमारी श्रेया गर्जे, समृद्धी पालवे, राधीका राहींज, दामोदर ठाणगे, लक्ष्मण पवार, छबुराव ठाणगे, ओंकार बांगर, अशोक गोहड, जालिंदर चत्तर, संदिप ठाणगे आदी उपस्थित होते.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, शहीद जवानांच्या स्मृती कायम वृक्षाच्या रुपाने हिवरेबाजारमध्ये राहणार आहे. शहीद जवानांचे बलिदान प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद व स्फुर्ती देणारे आहे. हिवरे बाजारमध्ये शहिद जवानांच्या स्मरणार्थ 51 पिंपळाची झाडांची लागवड करण्यात आल्याचे सांगून, त्यांनी जय हिंदच्या कार्याचे कौतुक केले.
शिवाजी पालवे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात जय हिंदच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावण्याचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. हे वृक्ष वीरांच्या पराक्रमाची साक्ष देत राहणार आहे. सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी प्रत्येक गावात हा उपक्रम राबविला गेल्यास आजी-माजी सैनिकांप्रती समाजात सन्मान वाढणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनाने व वीर जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. आभार मेजर एकनाथ माने यांनी मानले.