स्पर्धेत सहभागी होणारा जिल्ह्यातील पहिला संघ
या स्पर्धेतून दोन सर्वोत्तम संघ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत होणार सहभागी
नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित महाराष्ट्र स्टेट युथ लीग 2024 साठी नगर शहरातील फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीचा 15 वर्षा खालील संघ लोणावळ्याला रवाना झाला. या स्पर्धेमधून महाराष्ट्रातील दोन सर्वोत्तम संघ राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन युथ लीग साठी पात्र होणार आहेत. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पहिला संघ म्हणून सहभागी होण्याचा ऐतिहासिक मान फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी संघास मिळाला आहे.
फिरोदिया शिवाजीयन्सचा पहिला सामना शनिवारी (दि.23 नोव्हेंबर) मुंबईच्या डिसूजा फुटबॉल ॲकॅडमी विरोधात होणार आहे. स्पर्धे दरम्यान भारतातील नामांकित क्लब आणि अकॅडमीचे स्काऊटस खेळाडूंचे परीक्षण करणार आहेत. ही स्पर्धा लोणावळा येथील सिंहगड विद्यापीठाच्या (जि. पुणे) मैदानावर रंगणार आहे. पुढील तीन महिने ही स्पर्धा चालणार आहे. महाराष्ट्र स्टेट युथ लीगसाठी फक्त 10 संघांना प्रवेश दिला जातो. यामध्ये फिरोदिया शिवाजीयन्सचा समावेश झालेला आहे.
13 वर्षा खालील फिरोदिया शिवाजीयन्सचा संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू असून, संघ युथ लीगमध्ये डिसेंबरच्या मध्यावर सहभागी होणार आहे. संघ व्यवस्थापक म्हणून मुख्य प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी, व्यवस्थापक सचिन पाथरे, फिजिओ डॉ. अर्शी बगदादी, सहाय्यक व्यवस्थापक महिमा पाथरे काम पाहत आहे.
शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन ट्रस्टचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया यांनी संघातील खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पल्लवी सैंदाणे, अभिषेक सोनवणे, जोनाथन जोसेफ, राजेश अँथनी यांच्या परिश्रमामुळे फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीचा संघ या स्पर्धेत दाखल झाला आहे. हा ऐतिहासिक क्षण अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, अहमदनगर महाविद्यालय, समर्पित खेळाडू आणि नगरकरांच्या पाठिंब्याशिवाय शक्य झाला नसता, अशी भावना नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली. संघाला प्रायोजकत्व देणारे ग्रोथ एक्स व आय लव्ह नगर चे खेळाडूंनी आभार मानले.
फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीचा संघ पुढीलप्रमाणे:-
कर्णधार- माहीर गुंदेचा, उपकर्णधार- सौरभ खंडेलवाल, अंशुमन विधाते, आदर्श साबळे, अशोक चंद, अर्हम गुगळे, चिराग गोरे, दर्शन लवारे, फुरकान शेख, हर्षद सोनवणे, इंद्रजीत गायकवाड, जय मुथा, जोएल साठे, मयंक बजाज, नमन दिवाणी, ओम नितीन लोखंडे, ओम राजेंद्र लोखंडे, पवनराजे वाणी, राजवर्धन वीर, सोहेल खान, तक्ष लुणिया, तनीश पडागळे, वेदांत केळगंद्रे, वीरेंद्र वीर, यदुवर कोकरे.