बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात; उत्साहत रंगळा रिंगण सोहळा
नगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी दिंडीचा मुख्य आकर्षण ठरलेला रिंगण सोहळा पार पडला.
दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जयघोषात, पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत, हातात भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी उस्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते.
इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विठ्ठलाचे गीताने वातावरण प्रसन्न बनले होते. तर मथुरा आढाव यांनी गायलेले अभंग, संत जनाबाई यांची गवळण आणि कल्याणी म्याना यांनी गायलेले भक्तीगीताने परिसर भक्तीमय झाले होते. कार्यक्रमास पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, शिक्षक प्रतिनिधी अर्चना साळुंके, प्रा. बत्तीन पोटयान्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मेहेर यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त कविता गुडेवार यांनी उत्कृष्ट असे फलक लेखन केले. दिंडीचे उत्कृष्ट नियोजन रेणुका खरदास यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.