• Mon. Feb 16th, 2026

कौटुंबिक न्यायालयात पार पडला दिवाळी फराळचा कार्यक्रम

ByMirror

Oct 26, 2024

न्यायाधीश व वकीलांनी एकत्रितपणे घेतला फराळाचा आस्वाद

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कौटुंबिक न्यायालयात दिवाळी फराळचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. न्यायाधीश व वकीलांनी एकत्रितपणे फराळाचा आस्वाद घेऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी फराळच्या कार्यक्रमाप्रसंगी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश संगीता ना. भालेराव, औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे प्रशासकीय न्यायधीश एस.जी. देशपांडे, द्वितीय न्यायधीश ए.जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी (अण्णा) कराळे, ॲड. संदीप काळे, ॲड. मच्छिंद्र आंबेकर, ॲड. कल्याण पागर, ॲड. प्रणाली चव्हाण, ॲड. चंदन बारटक्के, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. मुकुंद पाटील, करुणा शिंदे, भूषण बऱ्हाटे, ॲड. संजय पाटील, ॲड. संतोष कांडेकर, ॲड. गिरीश कोळपकर, ॲड. ज्ञानेश्‍वर दाते, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. जयेश आमले, ॲड. हरिश कल्याणी, ॲड. पिंटू पाटोळे, ॲड. निखील सुपेकर, ॲड. धनंजय म्हस्के आदी उपस्थित होते.


न्यायाधीश संगीता ना. भालेराव म्हणाल्या की, न्यायदानासाठी वकील बांधव पक्षकार व न्यायालय यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावत असतात. पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरते. एकाच कुटुंबातील घटक म्हणून सर्व न्यायदान प्रक्रियेत योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. तर उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. न्यायाधीश व वकीलांचा आनंदमय वातावरणात दिवाळी फराळाचा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक एस.के. मोहोळकर, विवाह समुपदेशक अलका राठोड, अर्चना झिंजे, शेखर मेहेत्रे, धीरज नारखेडे, सतीश राऊत, सौ. चव्हाण, एल.एस. जाधव, एस.के. जाधव, एस.बी. अळकुटे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *